युवासेना मालवण शहर संघटकपदी ऋषिकेश सामंत यांची नियुक्ती

आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर यांनी केली नियुक्ती

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी नियुक्तीपत्र सुपूर्द करत पुढील वाटचालीस दिल्या शुभेच्छा

मालवण | प्रतिनिधी : युवासेना मालवण शहर संघटकपदी ऋषिकेश सामंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर यांनी ही नियुक्ती केली आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी ऋषिकेश सामंत यांना नियुक्तीपत्र देत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

 

दिलेल्या नियुक्तीपत्रात म्हटले आहे, वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने व शिवसेना मुख्य नेते श्री एकनाथ शिंदे साहेब (उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या आदेशानुसार, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे तसेच युवासेना कार्याध्यक्ष श्री पुर्वेश प्रताप सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली व आमच्या विनंतीनुसार आपली शिवसेना पक्षाच्या “युवासेना -मालवण शहर संघटक पदी नियुक्ती करण्यात येत आहे.

 

वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण आत्मसात करून शिवसेना पक्ष वाढीसाठी आपण सर्वाना सोबत घेऊन कार्य कराल असा विश्वास आहे. आपल्या सामाजिक व राजकीय क्षेत्रातील भावी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा.

 

यावेळी शिवसेना जिल्हा समन्वयक महेश कांदळगांवकर, शहरप्रमुख दिपक पाटकर, युवती सेना जिल्हाप्रमुख सोनाली पाटकर, युवासेना उपजिल्हाप्रमुख निषय पालेकर, उपजिल्हाप्रमुख मिहीर राणे, युवासेना तालुकाप्रमुख अभि लाड, युवासेना तालुकाप्रमुख स्वप्नील गावडे, वेरली सरपंच धनंजय परब यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.