कामथे-टेरव-खेर्डी रस्ता राज्य मार्ग १०९ दुरुस्ती करण्यास शासनाची मंजुरी

चिपळूण (प्रतिनिधी) : कामथे-टेरव- खेर्डी रस्ता राज्य मार्ग १०९ तात्काळ दुरुस्ती करण्यासाठी अनेक दिवस प्रयत्न सुरू होते. यबाबत २ महिन्यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली होती. सदर बैठकीत कार्यकारी अभियंता यांनी पाऊस गेल्यावर सदरच्या रस्त्याची दुरुस्ती करण्यत येईल असे आश्वासन दिले होते.
सदर रस्ता जिल्हा परिषदकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करण्यात आला असून महाराष्ट्र सरकारने सदर रस्ता दुरुस्ती, पूल परीक्षण व दुरुस्ती व अंतर्गत रस्ते विशेष कार्यक्रमा अंतर्गत ४ कामांसाठी ५६० लक्ष रूपये किमतीचा प्रस्ताव सचिव (रस्ते) बांधकाम विभाग यांच्याकडे सादर करण्यात आला आहे. निविदा प्रक्रिया पार पडल्यावर कामास सुरुवात करण्यात येणार आहे. सदर कामाची मंजुरी आमदार शेखर निकम यांच्या सहकार्याने मिळाली असून मागणी पूर्ण झाल्याबद्दल, समाधान व्यक्त करून आ. निकम यांचे ग्रामस्थ, सरपंच किशोर कदम, उपसरपंच, सौ. रिया म्हालिम, सदस्य ग्रामपंचायत टेरव यांनी आमदारांचे विशेष आभार व्यक्त केले आहेत. गावच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार शेखर निकम सर यांनी यापुढेही असेच सहकार्य करावे, अशी विनंती ग्रामस्थांच्या वतीने आमदारांना करण्यात आली आहे.