रत्नागिरी ः प्रतिनिधी
2 महाराष्ट्र नेवल युनिट एन सी सी रत्नागिरीतर्फे मेनु-26 वार्षिक प्रशिक्षण शिवीर दि.10 नोव्हेंबर ते 19 नोव्हेंबर 2025 या कालावधीत राबवण्यात येणार आहे. त्या मध्ये एकुण 60 राष्ट्रीय छात्र सेनेच्या मुलामुलीचा सहभाग असणार आहे. 10 नोव्हेंबर रोजी रत्नागिरी भगवतीबंदर येथुन या शिबीराचा प्रारंभ होत असुन रणपार, पावस, पुर्णगड, आंबोळगड, जैतापुर, विजयदुर्ग आणि परत त्याच मार्गाने रत्नागिरी येथे संपन्न होणार असल्याची माहिती 2 महाराष्ट्र नेवल युनिट एनसीसी रत्नागिरीचे कमांडिंग ऑफीस कमांडर रामांजुल दिक्षित यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या शिवीराचे प्रमुख सुत्रधार कमांडर रामांजुल दिक्षित असून त्यांच्या निरिक्षण व अनमोल मागदर्शनाखाली हे शिबीर संपन्न होणार आहे. या शिवीरासाठी संपुर्ण महाराष्ट्रातुन म्हणजेच रत्नागिरी, मुवई, पुणे, नागपुर मधुन राष्ट्रीय छात्र सेनेचे कॅडेट सहभागी होत आहेत. या शिवीरा दरम्यान विविध ॲक्टीवीटी करण्यात येणार असुन स्वच्छतेवावत जनजागृती अभियान “स्वच्छ कोंकण, समुद्र कोंकण, सुदर कोंकण“ यावर आधारित पथनाटयातुन राष्ट्रीय छात्रञ सेनेच्या कॅडेट यांच्या मार्फत सागरी किनारे स्वच्छतेेचा संदेश देण्यात येणार असल्याचे दिक्षित यांनी सांगितले. त्यानंतर बोलताना ते म्हणाले कि, रैपलींग, ट्रेकींग, ॲडवेन्चर अक्टीवीटी, पथनाटय अशा विविध ॲक्टीवीटी होणार आहेत. या कॅम्प मध्ये 2 भारतीय नौसेना अधिकारी, 2 एन सी सी अधिकारी, 2 गर्ल्स कॅडेट इन्सक्टर, 1 नौका प्रतिमान निर्देशक, 11 भारतीय नौसेना कर्मचारी, 1 आर्मी वैदयकीय कर्मचारी,8 राज्य शासकीय कर्मचारी स्टाफ, व राष्ट्रीय छात्र सेनाचे 30 मुले व 30 मुलींचा सहभाग असणार आहे. या शिवीराचे पुर्व प्रशिक्षण म्हणुन प्रि मेनु कॅम्प दि.24 ऑक्टोवर ते 2 नोव्हेबर 2025 यशस्वी रित्या संपन्न होत असुन त्यामध्ये एकूण 120 राष्ट्रीय छात्र सेनेच्या मुला व मुलीचा सहभाग झाला आहे. यामधुन पुढिल शिवीरासाठी 60 मुला व मुलींची निवड केली जात आहे. तसेच या शिवीरामध्ये सागरी प्रशिक्षण शिडांच्या नौकाचे प्रशिक्षण तसेच सरवायवल सागरी बचाव प्रशिक्षणही देण्यात आल्याचे कमांडर रामांजुल दिक्षित यांना सांगितले.
Home महत्वाच्या बातम्या एनसीसी ‘मेनू-२६’ प्रशिक्षण शिबिर: ६० कॅडेट्स देणार सागरी किनाऱ्यांवर स्वच्छतेचा संदेश












