चिपळूण (प्रतिनिधी) : चिपळूण व परिसरातील रुग्णांची दर्जेदार वैद्यकीय सेवा सुविधांची वाढती मागणी लक्षात घेऊन लाईफकेअर हॉस्पिटल चिपळूण यांनी विशेष तज्ज्ञ, निष्णात व अनुभवी स्पेशालिस्ट डॉक्टरांच्या मदतीने सुरु केलेले ‘सिटी पॅालिक्लिनिक ॲण्ड डायग्नोस्टीक सेंटर’ हे जुलै २०२२ पासून १ वर्ष अतिशय उत्तमरित्या ओपीडी व डायग्नोस्टिक सेवा सुविधा पुरवीत आहे. रुग्णांचा उत्तम प्रतिसाद व वेगवेगळ्या सुविधांची गरज पाहता व्यवस्थापन काही वाढीव सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील होते. या प्रयत्नांमधूनच येथे दि. १५ ऑगस्टपासून जनरल मेडिसिन व बालरुग्ण विभाग सुरु करण्यात आला आहे.
मंगळवार १५ ऑगस्ट रोजी जनरल मेडिसिन व बालरुग्ण विभागांचा भव्य शुभारंभ कन्सलटंट फिजिशियनडॉ. दिलीप पाटील आणि बालरोग तज्ज्ञ डॉ संजीव साने व डॉ विकास नातु यांच्या हस्ते करण्यात आला. उद्घाटन प्रसंगी डॉ. इसहाक खतीब, डॉ. विष्णू माधव, डॉ. समीर दळवी, डॉ. सायली माधव, डॉ. शोएब खतीब, डॉ. नदीम खतीब, डॉ. वसीम खतीब, डॉ. गणेश गदादे, डॉ. मंझूर मणियार व सर्व मान्यवर उपस्थित होते. याठिकाणी डॉ सत्यजीत हुजरे – कन्सलटंट फिजिशियन, मधुमेह आणि ऱ्हदयविकार तज्ज्ञ व डॉ अंकीता सुर्वे – बालरोग आणि नवजात शिशु तज्ज्ञ हे रुग्णसेवा पुरविणार आहेत. तसेच इमर्जन्सी रुग्णांवरील उपचार, आय.सी.यु., आंतर रुग्ण विभाग इ. पुढील उपचारांसाठी सर्व सुविधा NABH प्रमाणित/मानांकित लाईफकेअर हॉस्पिटल येथे उपलब्ध आहेत. तसेच बालरुग्णांसाठी इमर्जन्सी उपचार, आय.सी.यु., आंतर रुग्ण विभाग इ. सर्व सुविधा डॉ. विकास नातू यांचे डॉ. तात्यासाहेब नातू मेमोरियल हॉस्पिटल येथे उपलब्ध आहेत. सिटी पॉलिक्लिनिकच्या चालू सुविधांमध्ये या दोन सुविधांची वाढ झाल्यामुळे नागरिकांना अधिक दर्जेदार सुविधा उपलब्ध होत आहे त्याचा लाभ जास्तीत जास्त रुग्णांनी घ्यावा, असे आवाहन व्यवस्थापनाच्या वतीने डॉ. खतीब यांनी केले.
फोटो फाईल- सीपीएन१६-२३
सिटी पॉलिक्लिनिक चिपळूण येथे जनरल मेडिसिन व बालरोग विभागचा शुभारंभ प्रसंगी डॉ विकास नातू डॉ. संजीव साने आणि डॉ. अंकिता सुर्वे.












