खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उत्साहात साजरा झाला तालुकाध्यक्ष संजय जाधव यांचा वाढदिवस

खेड (प्रतिनिधी) :
खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष तसेच सामाजिक कार्यात नेहमीच आघाडीवर असणारे श्री. संजय जाधव यांचा वाढदिवस मंगळवार, दिनांक ४ नोव्हेंबर रोजी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या वाढदिवस सोहळ्याला दापोली विधानसभा क्षेत्राध्यक्ष सखाराम कदम उर्फ सतू दादा, माजी पंचायत समिती सदस्य श्रीधर गवळी, उमेश देवरुखकर, पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल मोरे, तसेच ज्येष्ठ कार्यकर्ते पांडुरंग पष्टे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या सुरुवातीस श्री. जाधव यांना उपस्थित कार्यकर्त्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतात श्री. जाधव यांच्या सामाजिक बांधिलकीचे, जनसंपर्कातील सहजतेचे तसेच खेड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी केलेल्या अथक प्रयत्नांचे कौतुक केले. स्थानिक कार्यकर्त्यांनीही श्री. जाधव यांच्या नेतृत्वाखाली पक्ष कार्य अधिक प्रभावीपणे सुरू राहील असा विश्वास व्यक्त केला. या कार्यक्रमात विविध स्तरांवरील कार्यकर्ते, ग्रामपंचायत सदस्य, युवक व महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी वाढदिवसाचा केक कापून सर्वांनी एकमेकांना शुभेच्छा देत आनंदाचा क्षण साजरा केला.