ओटवणे सातेरी, रवळनाथ देवस्थान जत्रोत्सव 5 व 10 नोव्हेंबर रोजी.

ओटवणे (प्रतिनिधी ) ओटवणे गावचे ग्रामदैवत श्री सातेरी रवळनाथ पंचायतनाचा वार्षिक जत्रोत्सव बुधवार 5 नोव्हेंबर आणि सोमवारी 10 नोव्हेंबर रोजी विविध धार्मिक कार्यक्रमानी संपन्न होत आहे. या जागृत देवस्थानच्या जत्रोत्सवाला 5 नोव्हेंबर पासून प्रारंभ होत आहे. सध्या मंदिरात महिनाभर जागरोत्सव कार्यक्रम सुरु आहे याची सांगताही होणार आहे. 5 नोव्हेंबर ला पहिली जत्रा होणार आहे दिवसभर धार्मिक कार्यक्रम पार पडल्यानंतर रात्री उशिरा पालखी सोहळा व त्यानंतर गावातील स्थानिक दशावतार कलाकारांचा दशावतार नाट्य प्रयोग होणार आहे.त्यानंतर दुसऱ्या दिवशी हरीनाम साप्ताहला प्रारंभ होणार आहे. कुळघराकडून निघालेली दिंडी उशिरा मध्यरात्री वाजत गाजत ढोल ताशाच्या गजरात मंदिराकडे येणार आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी या हरीनाम सप्ताहची सांगता होणार आहे. शनिवारी सरकारी समराधना, रविवारी गुरांची समराधना, आणि सोमवारी 10 नोव्हेंबर रोजी सातेरी ची म्हणजेच पंचमीची जत्रा होणार आहे याही दिवसभर धार्मिक कार्यक्रम देवाला साकडं घालणं,नवस फेडणे आदिसह विविध विधी पार पडणार आहेत रात्री उशिरा पालखी प्रदक्षिणा सोहळा आणि त्यानंतर आरोलकर दशावतार नाट्य मंडळाच्या नाट्य प्रयोगाने जत्रोत्सवाची सांगता होणार आहे. या जत्रोत्सवास भाविक भक्तांनी उपस्थित राहण्याचे आवाहन ग्रामस्थ तसेच स्थानिक देवस्थान कमिटी कडून करण्यात आले आहे.