रु.३९.६७ कोटी रुपये निधी मंजूर : शासननिर्णय जाहीर
मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांमुळे मंजुरी
वेंगुर्ले : दाजी नाईक
मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नाने प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंर्गत (PMMSY) वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा केरवाडा येथे मासळी उत्तरविण्यात येणाऱ्या केंद्राचे बांधकाम करणे या कामास रु.३९.६७ कोटी रुपये इतक्या रक्कमेच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्याअनुषंगाने आज शासननिर्णय जाहीर झाला आहे. दरम्यान या कामामुळे शिरोडा येथील मच्छीमारांना खूप फायदा होणार असून त्यांच्या मागणीला मान्यता मिळाल्याने मच्छीमार बांधवांमधून समाधान व्यक्त होत आहे.
केंद्र शासनाने प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत लाभार्थी हिस्सा नसलेल्या राज्यातील एकूण ९ मासळी उरविण्यात येणाऱ्या प्रकल्पाना मंजूरी दिली होती. राज्य शासनाने प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत केंद्र पुरस्कृत लाभार्थी हिस्सा नसलेल्या योजनांना प्रशासकीय मान्यता दिलेली आहे. तर महाराष्ट्र सागरी मंडळाने प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअर्पत (PMMSY) शिरोडा येथे मासळी उत्तरविण्यात देणाऱ्या केंद्राचे बांधकाम करणे या कामाचा रु.३९.६७ कोटी रक्कमेच्या कामास प्रशासकीय मान्यता देण्याची विनंती केली. त्यानुषंगाने, शिरोडा येथे मासळी उत्तरविण्यात देणाऱ्या केंद्राचे बांधकाम करणे या कामाचा रु.३९.६७ कोटी इतक्या रक्कमेध्या अंदाजपत्रकास मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव, मा.मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समितीच्या (HPC) मान्यतेसाठी सादर करण्यात आला असता, उच्चाधिकार समितीने त्यास मंजूरी प्रदान केलेली आहे.
या प्रकल्पाच्या अनुषंगाने, प्रशासकीय मान्यतेच्या मर्यादेतच काम पूर्ण करण्याची दक्षता घेण्यात यावी, कामासाठी येणाऱ्या खर्चाचे निधी वितरण शासानाची मान्यता घेऊन करण्यात यावे. तसेच योजनेची अंमलबजावणी करताना प्रचलित शासन निर्णय, नियम, CVC तत्वे, वित्तीय मर्यादा, विहित निविदा कार्यपध्दती अनुसरणे, आवश्यकतेनुसार राज्य तांत्रिक सल्लागार समितीने प्रकल्पाच्या व कामाच्या अनुषंगाने दिलेल्या निदेशांचे व त्रुटींची पूर्तता करणे आवश्यक असणार आहे.
दरम्यान शिरोडा केरवाडा येथे मोठ्या प्रमाणात मच्छीमार बांधवांकडून मासे व्यवसाय केला जातो. मात्र मासळी उतरवण्याच्या ठिकाणी हव्या त्या सुविधा नसल्याने अनेक अडचणींना या मच्छीमार बांधवांना दरवर्षी सामोरे जावे लागत होते. मात्र आता येथे मासळी उत्तरविण्यात येणाऱ्या केंद्राचे बांधकाम झाल्यावर एकाच ठिकाणी मच्छीमारांसाठी आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध होणार आहेत. मच्छीमारांना व्यवस्थितरित्या आपल्या मासेमारी नौका किनाऱ्यालगत लावता येणार आहेत. लिलाव प्रक्रिया सुलभ पद्धतीने करता येणार आहे. मत्स्य वाहतूक करणाऱ्या गाड्या थेट या केंद्रापर्यंत जाणार आहेत. त्यामुळे सर्वांनाच याचा फायदा होणार आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या मुळे मंजुरी मिळालेल्या या शिरोडा येथील प्रकल्पाचा मामा मच्छीमार बांधवांना फायदा होणार आहे. त्यामुळे आम्ही पालकमंत्री नितेश राणे आणि शासनाचे आभारी असल्याचे शिरडा येथील मच्छीमार नेते बाबा नाईक यांनी सांगितले.













