मालवण नगरपरिषद कंत्राटी स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी ही शिवसेनेच्या वतीने साहित्य वितरण
शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची प्रमुख उपस्थिती
मालवण | प्रतिनिधी : मालवण शहारातील घनकचरा व्यवस्थापनासाठी आमदार निलेश राणे यांच्या पाठपुराव्यातून १ कोटी ९८ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. दरम्यान, मालवण नगरपालिका कचरा संकलन व शहर स्वच्छतेसाठी काम करणाऱ्या सर्व कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पर्सनल प्रोटेक्टीव इक्विपमेंट युनिफॉर्म (पीपीई किट व साहित्य) शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत वितरीत करण्यात आले.
यावेळी शिवसेना शहर प्रमुख दिपक पाटकर, मुख्याधिकारी हेमंत किरुळकर, जिल्हा प्रवक्ते तथा मच्छिमार आघाडी जिल्हाप्रमुख राजा गांवकर, कुडाळ-मालवण विधानसभेचे सोशल मिडीया प्रमुख किसन मांजरेकर, उपजिल्हाप्रमुख विश्वास गांवकर, माजी नगरसेवक जगदीश गांवकर, शिवसेना शहर संघटक राजु बिडये, शहर सचिव महेश सारंग, मच्छिमार आघाडी शहर प्रमुख वसंत गावकर, युवती जिल्हाप्रमुख सोनाली पाटकर, जिल्हा संघटक अंजना सामंत, उपतालुकाप्रमुख बाळू नाटेकर, आचरा विभाग प्रमुख संतोष कोदे, शाखा प्रमुख शिवाजी केळुसकर, भाई मांजरेकर व इतर शिवसैनिक उपस्थित होते.
वितरित करण्यात आलेल्या पीपीई किटमध्ये हॅन्ड ग्लोज, सॅनिटायझर, हॅन्ड वॉश, गम बूट असे साहित्य देण्यात आले आहे.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत म्हणाले, सफाई कर्मचारी म्हणजे शहराचे स्वच्छतेपासून रक्षण करणारा योद्धाच आहे. सामाजिक भानातून सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान व त्यांची सुरक्षा ही आपली जबाबदारी आहे. यामुळेचे आमदार निलेश राणे यांच्या पाठपुराव्याने घनकचरा व्यवस्थापनासाठी मंजूर झालेल्या प्रकल्पात शहर स्वच्छते सोबतच शहराच्या स्वच्छतेची काळजी घेणारा सफाई कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेची हमी घेण्यात आलेली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून अधिकाधिक विकासकामे होणारच असा विश्वास दत्ता सामंत यांनी व्यक्त केला. दिपक पाटकर यांनी आम्ही सर्व कर्मचारी यांच्या हिताच्या दृष्टीने सोबत असल्याचे सांगितले.











