तिलारीनगर येथे गोव्याला जाणारे मांस पकडले; स्थानिक नागरिकांकडून पोलीस गेट बसवण्याची मागणी

दोडामार्ग l प्रतिनिधी:बेळगाव-गोवा राज्य मार्गावर मोठ्या प्रमाणात गो मांस तस्करी होत असल्याचा संशय पुन्हा एकदा बळावला आहे. स्थानिक नागरिक आणि हिंदू कार्यकर्त्यांच्या जागरूकतेमुळे आज, सकाळी तिलारीनगर येथे एका टेम्पोमधून हे मांस पकडण्यात आले. टेम्पो अचानक बिघडल्याने ही बाब उघडकीस आली.तिलारीनगर हून गोवा राज्याकडे वाहतूक केली जात होती बेळगावहून गोवा (Goa) राज्याकडे टेम्पोमध्ये मांस वाहतूक केली जात होती

स्थानिकांना गो मांस असल्याचा संशय आहे. त्यामुळे त्यांनी सदर गाडीची चौकशी केली असता त्यांनी

पोलिसांना सागितले बेळगावहून गोव्याला मोठ्या प्रमाणात गो मांस वाहतूक केली जाते. अनेकवेळा स्थानिक जागृत नागरिक व हिंदू कार्यकर्त्यांनी अशा गाड्या पकडून दिल्या आहेत. आज सकाळी तिलारीनगर येथे मांस घेऊन जाणारा एक टेम्पो बंद पडल्याने, त्यातील अवैध वाहतूक उघड झाली.

याप्रकरणी चंदगड पोलिसांनी तात्काळ कारवाई केली असून, अधिक तपास सुरू आहे.

 

तिलारीनगर येथे पोलीस गेट बसवण्याची मागणी

तिलारी घाटातून अनेक वेळा दारू व अन्य वस्तूंची तस्करी केली जात असल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. तसेच, घाटात अनेक वेळा घातपाताच्या घटनाही झाल्या आहेत. या सर्व बाबींची दखल घेऊन, तिलारीनगर येथे पोलीस चेक-पोस्ट (गेट) बसविण्यात यावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

नागरिकांच्या म्हणण्यानुसार, येथे पोलीस गेट बसवल्यास पोलिसांना अवैध वाहतूक रोखण्यात मोठे यश मिळू शकेल आणि परिसरातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत होईल.