किंजवडे-पाडावेवाडी : गांगेश्वर क्रीडा मंडळ, किंजवडे-पाडावेवाडी यांच्या वतीने देवगड तालुका मर्यादित भव्य ओपन टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा शनिवार, दि. ८ नोव्हेंबर ते बुधवार, दि. १२ नोव्हेंबर २०२५ दरम्यान पार पडणार आहे.
या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ शनिवार, दि. ८ नोव्हेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता होणार असून, एकूण १६ संघांमध्ये लीग पद्धतीने सामने खेळवले जाणार आहेत.
विजेत्या संघाला ₹५०,००० रोख रक्कम व आकर्षक चषक, तर उपविजेत्या संघाला ₹२५,००० रोख रक्कम व चषक देण्यात येणार आहे. तसेच सर्वोत्तम फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक या विभागांतही प्रत्येकी ₹५,००० चे विशेष पारितोषिक ठेवण्यात आले आहे.
स्पर्धेचे थेट प्रक्षेपण YouTube वर पाहता येणार आहे. सर्व क्रिकेटप्रेमी व रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्पर्धेचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजक गांगेश्वर क्रीडा मंडळ, किंजवडे-पाडावेवाडी यांनी केले आहे.











