चौके प्रतिनिधी :-मालवण तालुक्यातील प्रसिद्ध देवस्थान नांदरुख गावचे ग्रामदैवत श्री देव गिरोबा देवाचा वार्षिक जत्रोस्तव उद्या गुरुवार दिनांक 07 नोव्हेंबर 2025 रोजी संपन्न होत आहे.
या निमित्ताने सकाळी नेहमीप्रमाणे देवांची पूजाअर्चा केली जाते. दिवसभर ओट्या भरण्याचा कार्यक्रम. रात्री नांदरुख गावातील पलीकडची वाडी येथून देवाची पालखी गावकर्यांसोबत वाजत गाजत फटाक्यांच्या आतिषबाजीत श्री गिरोबा मंदिर येथे आणली जाते रात्री उशिरा मंदिराभोवती पालखी प्रदर्शना झाल्यानंतर वालावलकर दशावतार नाट्य मंडळाचा पौराणिक नाट्य प्रयोग सादर केला जातो. सकाळी गाडगे फोडून जत्रोत्सवाची सांगता होते











