रत्नागिरी नगरपरिषद निवडणूक: मनसेकडून सर्व जागा लढवण्याची तयारी

रत्नागिरी: रत्नागिरी नगरपरिषद निवडणुकीचे पडघम वाजू लागताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आपली कंबर कसली असून, पक्षाने शहरातील सर्व जागांवर उमेदवार देण्याची तयारी सुरू केली आहे. याच अनुषंगाने, दिनांक ६ नोव्हेंबर २०२५ रोजी मनसे रत्नागिरी शहर कार्यालय येथे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची आणि इच्छुक उमेदवारांची एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीत आगामी निवडणुकीसाठी पक्षाची रणनीती निश्चित करताना सुशिक्षित, सर्वसमावेशक आणि तुल्यबळ उमेदवारांची चाचपणी करण्यात आली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार, रत्नागिरी नगरपरिषद निवडणुकीत पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन यावेळी उपस्थित महाराष्ट्र सैनिकांना करण्यात आले.

मनसे रत्नागिरी तालुका अध्यक्ष श्री. रुपेश जाधव, शहर संघटक श्री. अमोल श्रीनाथ, आणि मनविसे जिल्हा अध्यक्ष श्री. गुरूप्रसाद चव्हाण या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उपस्थित पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवारांना मार्गदर्शन केले. त्यांनी कार्यकर्त्यांना घरोघरी जाऊन प्रचाराला जोमाने सुरुवात करण्याचे निर्देश दिले.

या बैठकीला उप शहराध्यक्ष श्री. राजेश नंदाने, उपशहर अध्यक्ष राहुल खेडेकर, उपशहर अध्यक्ष इम्रान नेवरेकर, विभाग अध्यक्ष अक्षय सुतार, उपतालुका अध्यक्ष सौरभ पाटील, विभाग अध्यक्ष सोम पिलणकर, तालुका सचिव ॲड. अभिलाष पिलणकर, महिला उपशहर अध्यक्षा द्वारकाताई नंदाने, शाखा अध्यक्ष अप्पू सुतार, शाखा अध्यक्ष फरदीन गुहागरकर, शाखा अध्यक्ष प्रसाद भाटकर, विभाग अध्यक्ष दिलीप नागवेकर, तेजस नागवेकर, विशाल सुवरे, तीर्था प्रसाद भाटकर, प्रथम बेग आदींसह अनेक मनसे पुरुष, महिला पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.