मसुरे | झुंजार पेडणेकर : ग्रामपंचायत हिंदळे आणि हिंदळे ग्रामोन्नती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने १० नोव्हेंबर २०२५ सकाळी ९ ते १२.३० यावेळेत विद्यामंदिर सभागृह, वाचनालय, हिंदळे भंडारवाडा येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर
आयोजित करण्यात आले आहे. यावेळी
डॉ. प्रशांत मडव (मधुमेह विशेष तपासणी),डॉ. अरुण गुमास्ते,
डॉ गार्गी ओरसकर
यांच्याकडून रुग्णांची मोफत तपासणी आणि उपचार केले जातील.
अधिक माहितीसाठी
श्री. मकरंद शिंदे (सरपंच, हिंदळे) मो. 9757129112
, डॉ. रामदास बोरकर मो. 9422584038 येथे संपर्क साधावा.












