राजापूर : हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान राजापूर च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य गडदुर्ग बांधणी स्पर्धा २०२५ चा बक्षिस समारंभ नुकताच गुरूवर्य कै. वासुकाका जोशी भवन येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात उत्साहात पार पडला. या स्पर्धेमधील छोट्या गटातील विजेते, प्रथम क्रमांक देवाशिष नवरे, द्वितीय क्रमांक ओंकार सावंत, तृतीय क्रमांक संभव पांचाळ आणि उत्तेजनार्थ ओम बावधनकर. मोठा गट प्रथम क्रमांक पांचाळ परिवार, द्वितीय क्रमांक चिन्मय व अथर्व आरेकर, तृतीय क्रमांक चिन्मय व आदित्य शिवलकर आणि उत्तेजनार्थ चंडिका देवी आंगले यांनी मिळवला आहे. या सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राजापूर सरसंघचालक राजेंद्र कुशे, महिला पतपेढीच्या अध्य्यक्षा सौ. श्रुती ताम्हणकर, हिंदु विधिज्ञ परिषदेचे अधिवक्ता चंद्रशेखर अभ्यंकर, स्पर्धेचे परिक्षक संतोष जुवळे, भाजप तालुकाध्यक्ष मोहन घुमे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश मयेकर आणि प्रतिष्ठानचे सर्व शिलेदार उपस्थित होते.
यावेळी स्पर्धेत सहभागी सर्व दुर्गवीर स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. नवयुग फोटो स्टुडीओचे प्रदीप कोळेकर यांनी हे प्रमाणपत्र पुरस्कृत केले होते.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये महेश मयेकर यांनी प्रतिष्ठानच्या आज पर्यंतच्या १४ वर्षाच्या कार्याचा आढावा घेतला. प्रतिष्ठानच्या माध्यमातुन दरवर्षी राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांबत त्यांनी माहिती दिली.
यावेळी या दुर्गवीरांना मार्गदर्शन करतांना चंद्रशेखर अभ्यंकर यांनी गडदुर्ग बांधतांना छत्रपती शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन या गडदुर्गांच्या प्रतिकृती साकारायला हव्यात, छत्रपती शिवरायांनी मावळ्यांना एकत्र करुन, संघटित करुन हिंदवी स्वराज्य स्थापन केले. याच प्रमाणे दुर्गवीरांनी शिवकालिन ऐतिहासिक काळाचा अभ्यास करुन या गडदुर्गांच्या प्रतिकृती साकारतांना छत्रपती शिवरायांचे कार्य आणि स्वराज्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या शुरवीर मावळ्यांना अनुभवायला हवे सांगितले. याप्रसंगी सौ. श्रुती ताम्हणकर यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी गडदुर्गांच्या प्रतिकृती साकारणा-या दुर्गवीर देवाषिश नवरे, आदित्य नार्वेकर, ओंकार सावंत, तन्मय शिवलकर, ओंकार पांचाळ, कुमार चव्हाण कुमारी सुतार इत्यादींनी गडदुर्ग साकारतानाचे आपले अनुभव कथन केले.या स्पर्धेचे परिक्षण संतोष जुवळे, राहुल ताईशेट्ये आणि महेश मयेकर यांनी केले. या स्पर्धेचे सुत्रसंचालन अभिजित नार्वेकर यांनी केले, तर आभार महेश मयेकर यांनी मानले.
यावेळी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष विवेक गुरव, कार्याध्यक्ष मंदार बावधनकर, सचिव निकेश पांचांळ, खजिनदार प्रसन्न देवस्थळी, संदीप मसुरकर, निखिल चव्हाण, वैभव तोरस्कर, जगदीश पांचांळ, प्रतिक मयेकर इत्यादी शिलेदार आणि अनेक छोटेमोठे बालवीर उपस्थित होते.












