जामिनावर मुक्तता झालेल्या संशयितांनी घेतली ओरोस येथे भेट
दोडामार्ग l प्रतिनिधी :तिलारी येथे गोमांस वाहतुकीच्या संशयावरून झालेली मारहाण व कार जाळपोळ प्रकरणातील संशयीतांची न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली. त्यानंतर या सर्वांनी राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री ना. नितेश राणे यांची ओरोस येथे भेट घेऊन आभार व्यक्त केलेत.
यावेळी नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी घटनास्थळी झालेला प्रकार ना. नितेश राणे यांना कथन केला. यावेळी ना. नितेश राणे यांनी आपण घाबरू नका. मी तुमच्यासोबत आहे. राज्यात हिंदुत्ववादी विचारांचे सरकार असून आम्ही कायम आपल्या सोबत राहू, असे आश्वस्त केले.
यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, उपाध्यक्ष रणजीत देसाई, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, दोडामार्ग तालुकाध्यक्ष दिपक गवस, दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष परशर सावंत, उपाध्यक्ष
आनंद तळणकर, देवेंद्र शेटकर, संजय सातार्डेकर, गणपत डिंगणेकर, विशाल चव्हाण, वैभव रेडकर, शाम गोवेकर, महेश धर्णे, अरविंद धर्णे, राज तांबे, कलय्या हिरेमठ, प्रदीप गावडे, महेंद्र खरवत, विशाल चव्हाण, विजय कांबळे, राज बोन्द्रे आदी उपस्थित होते.












