विक्रीसाठी आणलेला गांजा वृद्ध महिलेकडून जप्त

 

प्रतिनिधी/ रोहन कांबळे

कोल्हापूर: हातकणंगले तालुक्यातील तारदाळ येथील लक्ष्मी आनंदा गुरव (वय ६०) या वृद्ध महिलेस गांजा विक्रीसाठी जवळ बाळगल्या प्रकरणी शहापूर पोलीसांनी अटक केली. या कारवाईत २७३ ग्रॅम वजनाचा ८१९० रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, तारदाळ गावातील तुळजाभवानी अपार्टमेंट परिसरात एका पत्र्याच्या शेडनजीक शहापूर पोलिसांनी छापा टाकला.त्यावेळी लक्ष्मी गुरव या वृद्ध महिलेकडे प्लॅस्टिकच्या पिशवीत हिरवट पाने फुले काड्या व बिया सलग्न असलेला उग्र वासाचा गाठी झालेला गांजा आढळून आला.त्यांच्याकडून हा गांजा जप्त करण्यात आला.ही कारवाई पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक किशोरी साबळे यांच्या पथकाने केली.