मुंबई येथे नियुक्ती : लवकरच स्वीकारणार पदभार
मालवण | प्रतिनिधी : महसुल विभागात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. मालवण तहसीलदार वर्षा झालटे यांनाही बढती मिळाली आहे. मुंबई येथे उपजिल्हाधिकारी म्हणून त्यांना नियुक्ती देण्यात आली आहे.
तहसीलदार वर्षा झालटे या गेली अडीज वर्षे मालवण तहसीलदार म्हणून कार्यरत आहेत. एक कार्यतत्पर महिला अधिकारी अशी ओळख त्यांनी आपल्या कार्यातून निर्माण केली. लवकरच त्या मुंबई येथे त्यांच्या विभागाचा उपजिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारणार आहेत.
मंगळवारी दिवसभर त्यांना महसूल विभागासोबत सर्वच स्तरातून शुभेच्छा दिल्या जात होत्या. महसूल विभागातील नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी यांसह अधिकारी, कर्मचारी यांनी भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.













