शिक्षक समिती शाखा लांजा च्या वतीने २९ वा विद्यार्थी, शिक्षक गुणगौरव सोहळा संपन्न

लांजा (प्रतिनिधी) प्राथमिक शिक्षक समिती शाखा लांजा तर्फे आयोजित विद्यार्थी, आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षक व शाळा तसेच सेवानिवृत्त सभासद आदींचा गुणगौरव व सत्कार सोहळा नुकताच पी एम श्री शाळा लांजा नं. ५ येथे संपन्न झाला
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिपक शिंदे होते त्यांच्या समवेत जिल्हा नेते दिलीप महाडिक, कार्याध्यक्ष रुपेश जाधव, पतपेढी संचालक श्री खांडेकर, संचालिका प्रांजली धामापूरकर, लांजा गटशिक्षणाधिकारी विनोद सावंग, विस्ताराधिकारी चंद्रकांत पावस्कर, राज्य ऑडिटर अंकुश गोपने आदी उपस्थित होते.
शालेय जिवनात मिळविलेल्या यशाबद्दल त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारावी, विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी म्हणून शिक्षक समितीच्या लांजा शाखेच्या वतीने अविरतपणे २९ वर्ष हा गुणगौरव सोहळा आयोजित केला जातो. त्यामध्ये इयत्ता पाचवी ते आठवी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी, नवोदय विद्यालय निवड विद्यार्थी, आदर्श शिक्षक नितीन शेंडगे, शिष्यवृत्ती मार्गदर्शक शिक्षक श्रीनिवास माने यांचा सत्कार करण्यात आला. तसेंच सेवानिवृत्त शिक्षक यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला.
यावेळी बोलताना गटशिक्षणाधिकारी विनोद सावंग यांनी शिक्षक समितीचा हा उपक्रम असाच भविष्यातही चालू ठेवावा व तालुक्यातील शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी शिष्यवृत्ती सराव परीक्षा शिक्षक समिती घेणार आहे त्याबद्दल आभार व्यक्त केले. अध्यक्ष स्थानावरून बोलताना जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे यांनी तालुका शाखेचे कौतुक केले. लांजा शाखेच्या वतीने असे विविध उपक्रम राबवत असतात त्याबद्दल तालुकाध्यक्ष श्री दिलीप दिवाळे व सरचिटणीस श्री दिनेश झोरे व सर्व सहकाऱ्यांना धन्यवाद दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपाध्यक्ष सुरेश आगळे यांनी केले व आभार कोषाध्यक्ष सुदेश आयरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक समितीचे तालुका अध्यक्ष दिलीप दिवाळे, सचिव दिनेश झोरे ,उपाध्यक्ष सुरेश आगळे, कार्याध्यक्ष चंद्रकांत कांबळे, कोषाध्यक्ष सुदेश आयरे, तालुका नेते तुकाराम कोलापटे यांच्यासह सर्व कार्यकारणी पदाधिकारी व सदस्य यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाला नवनियुक्त शिक्षकांची उपस्थिती मोठया प्रमाणात होती