सेवानिवृत्त नेव्ही अधिकारी भिकाजी अस्वेकर यांचे निधन

कणकवली : तालुक्यातील आशिये बौद्धवाडी येथील सेवानिवृत्त नेव्ही अधिकारी भिकाजी धोंडू अस्वेकर (वय ८२) यांचे बुधवारी ११ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता कोल्हापूर येथील एका रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी (आज) सकाळी ८ वा. येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अस्वेकर यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, जावई, नातू व नात असा परिवार आहे.