वेंगुर्ले : प्रतिनिधी
कोचरे गावातील भावई देवीचा जत्रोत्सव यावर्षी दि. १७ नोव्हेंबर रोजी उत्साहात व भक्तिभावाने संपन्न होत आहे. या जत्रोत्सवाचे औचित्य साधून दिवसभर विविध धार्मिक विधी व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जत्रेच्या पहाटेच भावई देवीचा अभिषेक, त्यानंतर श्रृंगार पूजा होणार असून, नंतर ओटी भरण्याचा धार्मिक विधी पार पाडला जाणार आहे. रात्री ११ वाजता पालखी सोहळा असणार आहे. आणि पालखी नंतर बाळकृष्ण गोरे दशावतार नाट्य मंडळ यांचा पारंपरिक दशावतार नाट्य सादर होणार आहे.













