वैभववाडी प्रतिनिधी
विषारी औषधं प्राशन केलेल्या तरुणाचा उपचारदरम्यान मृत्यू झाला आहे. समीर शांताराम माईणकर वय ३८ रा. वैभववाडी माईणकरवाडी असे या तरुणाचे नाव आहे. ही घटना शनिवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास घडली. वैभवावाडी पोलीस ठाणेत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मयत समीर माईणकर यांचे वैभववाडी बाजारपेठेत जनरल स्टोअर आहे. गेले चार दिवस त्यांची मानसिक स्थिती बिघडली होती. त्यातच त्याने शुक्रवारी रात्री विषारी कीटक नाशक प्रशान केले. ही बाब कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांना प्रथम ग्रामीण रुग्णालय वैभववाडी येथे दाखल केले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे प्राथमिक उपचार उपचार करून अधिक उपचारासाठी त्यांच्या कुटुंबियांनी कणकवली येथे एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी उपचारादरम्यान त्यांची प्राण ज्योत मालवली. त्याच्या पश्चात आई वडील पत्नी दोन मुलगे विवाहित बहिणी भाऊ असा मोठा परिवार आहे.
मयत समीर यांचा शांत, मनमिळाऊ स्वभाव होता. त्यांच्या अशा पद्धतीने आकस्मिक मृत्यू मुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समाजात संपूर्ण वैभववाडी बाजारपेठ बंद ठेऊन त्याला श्रद्धांजली वाहण्यात आली. शनिवारी दुपारी त्याच्यावर अंत्यसंकार करण्यात आले. यावेळी तालुक्यातील व्यापारी, व सर्वच क्षेत्रातील मंडळी मोठया संख्येने उपस्थित होती.











