मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य ट्रॉफीचे अनावरण
सावंतवाडी । प्रतिनिधी :
सावंतवाडी प्रीमियर लीग (SPL) सीझन 2.0 आणि निरवडे चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 या बहुप्रतिक्षित क्रिकेट महोत्सवाच्या तयारीला आता अंतिम स्वरूप प्राप्त झाले आहे. या भव्य स्पर्धेसाठी खेळाडूंचा लिलाव सोहळा आणि त्यानंतर ट्रॉफी अनावरण समारंभ आज श्री लक्ष्मण उर्फ आना गावकर यांच्या शालू मंगल कार्यालय येथे मोठ्या उत्साहात पार पडला. ३ डिसेंबर ते ७ डिसेंबर २०२५ या कालावधीत होणाऱ्या या क्रिकेट स्पर्धेबाबत संपूर्ण परिसरात कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.
आज झालेल्या खेळाडूंच्या लिलावानंतर, स्पर्धेच्या आकर्षक ट्रॉफीचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या सोहळ्याला स्थानिक राजकारण, समाजकारण आणि क्रीडा क्षेत्रातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होत्या.
ट्रॉफी अनावरण सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून भाजपा सावंतवाडी शहर मंडळ अध्यक्ष सुधीर आडिवरेकर, लायन्स क्लब झोनल अध्यक्ष अमेय पै, मळगांव सरपंच हनुमंत पेडणेकर, वेत्ये सरपंच गुणाजी गावडे, निरवडे उपसरपंच अर्जुन पेडणेकर, युवा उद्योजक भुषण बांदिवडेकर, श्री. सामाजिक कार्यकर्त कृष्णा बांदिवडेकर आदी उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफीचे अनावरण करण्यात आले. मान्यवरांनी आपल्या प्रेरणादायी संदेशांनी कार्यक्रमाला विशेष ऊर्जा प्रदान केली, ज्यामुळे उपस्थित सर्व क्रिकेटप्रेमींमध्ये एक वेगळाच उत्साह संचारला होता.
या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनामागे युवा आयोजक शरद बांदिवडेकर, जयेश बांदिवडेकर, यशवंत बांदिवडेकर, अमर बांदिवडेकर, सर्वेश नाईक, समीर केरकर, रुपेश मयेकर, सर्वेश पायनाईक, सूरज शिरोडकर, बाप्पा तानवडे— आणि निरवडे येथील युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
आगामी स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विविध संघांकडून प्रेक्षकांना रोमांचक आणि चुरशीचे सामने पाहायला मिळतील अशी अपेक्षा आहे. ही लीग स्थानिक क्रिकेटपटूंना आपले कौशल्य दाखवण्यासाठी आणि त्यांना मोठे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण संधी ठरणार आहे.
आयोजकांनी सर्व क्रिकेटप्रेमींना ३ ते ७ डिसेंबर २०२५ या दरम्यान होणाऱ्या या भव्य क्रिकेट पर्वाचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.










