
आमदार निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती : मालवण नगरपरिषद शिवसेनेच्या सर्व उमेदवारांच्या विजयाचा व्यक्त केला ठाम विश्वास
पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांची मोठी उपस्थिती : जोरदार घोषणाबाजी
मालवण : आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात शिवसेनेने बहुसंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांच्या उपस्थितीत मालवण नगर परिषद निवडणुकीसाठी शिवसेना पक्षातर्फे नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार सौ. ममता वराडकर यांच्यासह नगरसेवक पदासाठीचे उमेदवार शहरप्रमुख श्री. दीपक पाटकर व अन्य सर्व उमेदवार यांनी निवडणूक निर्णय अधिकारी श्री. सूर्यकांत पाटील तसेच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व मुख्याधिकारी श्री. प्रतीक थोरात यांच्या कडे उमेदवारी अर्ज सादर केले. यावेळी आमदार निलेश राणे यांनी सर्व उमेदवारांना पुढील वाटचालीसाठी व विजयासाठी शुभेच्छा दिल्या.
जनतेच्या आशीर्वादाने शिवसेनेचे सर्व उमेदवार विजयी होतील. खासदार राणे साहेब यांच्या मार्गदर्शनात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून मालवण शहर विकासासाठी कोट्यावधी विकासनिधी आणण्यासाठी कटीबद्ध असल्याचे आमदार निलेश राणे यांनी सांगितले.
मालवण शहर विकासाचे व्हिजन त्यांनी मांडले. मालवण शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि जनतेच्या प्रगतीसाठी शिवसेना पक्ष कटिबद्ध असून या नगरपरिषद निवडणुकीत जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी आमचे सर्व उमेदवार सज्ज आहेत…! असे स्पष्ट केले.
यावेळी शिवसेना उपनेते संजय आंग्रे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, माजी आमदार राजन तेली, जिल्हा समन्वयक महेश कांदळगांवक, उपजिल्हाप्रमुख विश्वास गांवकर, विधानसभा प्रमुख बबन शिंदे, जिल्हा प्रवक्ते राजा गांवकर, सोशल मीडिया प्रमुख किसन मांजरेकर, श्री. संजय पडते, जिल्हा सचिव श्री. दादा साईल, महिला जिल्हाप्रमुख सौ. दीपलक्ष्मी पडते, श्री. उमेश नेरुरकर, मोहन वराडकर, राजन सरमळकर, अंकित नेरुरकर, युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर, काका कुडाळकर, तालुकाप्रमुख राजा गावडे, विनायक बाईत, उपतलूकाप्रमुख बाळू नाटेकर, निकीत वराडकर, शहर संघटक राजू बिडये यांच्यासह शिवसेना पक्षाचे सर्व पदाधिकारी नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
▪️अमित खोत | मालवण












