एकता मार्ग येथे बेकायदेशीर जुगार खेळणाऱ्यांवर गुन्हा

रत्नागिरी ः प्रतिनिधी
शहरातील एकता मार्ग येथील संसारे गार्डनजवळ बेकायदेशिरपणे जुगार खेळ चालवणार्‍या दोघांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई शनिवार 15 जुलै रोजी सायंकाळी 5.27 वा.करण्यात आली.
बिलाल दिलावर शहा,दिलीप वसंत धनावडे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोन संशयितांची नावे आहेत.शनिवारी सायंकाळी शहर पोलिस एकता मार्ग परिसरात गस्त घालत असताना त्यांना संसारे गार्डनच्या बाजुला हे दोघे विना परवाना कल्याण मटका जुगार खेळ चालवत असताना मिळून आले.त्यांच्याविरोधात महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.