उमरे फाटा येथे टेम्पोला धडक देणाऱ्या दुचाकी चालकावर गुन्हा

 

रत्नागिरी ः प्रतिनिधी : बेदरकारपणे दुचाकी चालवून टेम्पोला धडक देत अपघात केल्याप्रकरणी चालकाविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अपघाताची ही घटना सोमवार 10 जुलै रोजी दुपारी 12.30 वा.रत्नागिरी ते देवधे जाणार्‍या रस्त्यावरील उमरे फाटा येथे घडली आहे.
प्रसाद दिनकर मोहिते असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे.सोमवारी दुपारी तो आपल्या ताब्यातील दुचाकी (एमएच-08-एसी-0617) वरुन रत्नागिरी ते देवधे रस्त्यावर आला असता त्याने रस्त्याच्या विशिष्ट परिस्थितीकडे दुर्लक्ष करत हयगयीने चालवून (एमएच-08-एच-8322) या टेम्पोला धडक देत अपघात केला.या अपघातात त्याला दुखापत झाली असून दोन्ही वाहनांचे नुकसान झाल्याप्रकरणी त्याच्याविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्याच्या विरोधात भादंवि कायदा कलम 279,337 मोटार वाहन कायदा कलम 184,129,177 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी अधिक तपास ग्रामीण पोलिस करत आहेत.