वि. मं. आचिर्णे कडूवाडी शाळा दुरुस्ती कामाचा शुभारंभ

जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे यांचे विशेष प्रयत्न

शा. व्य. समिती व ग्रामस्थांनी मानले नामदार नितेश राणे यांचे जाहीर आभार 

वैभववाडी l प्रतिनिधी :        वि. मं आचिर्णे कडूवाडी प्राथमिक शाळा इमारत दुरुस्ती कामाचा शुभारंभ सरपंच वासुदेव रावराणे यांच्या शुभहस्ते करण्यात आला. शाळा दुरुस्तीसाठी तात्काळ निधी मिळावा यासाठी जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे यांनी पालकमंत्री नितेश राणे यांचे लक्ष वेधले होते. नामदार नितेश राणे यांनी या शाळेसाठी तात्काळ निधी उपलब्ध करून दिला आहे. दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय दुर होणार आहे. निधी दिल्याबद्दल शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांनी नितेश राणे व दिलीप रावराणे यांचे आभार मानले.

विद्या मंदिर आचिर्णे कडूवाडी ही शाळा धोकादायक बनली होती. पावसाळ्यात विद्यार्थ्यांना शाळेत बसणे अवघड झाले होते. दरम्यान शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना पर्यायी खाजगी जागेत हलविले होते. पालक व शाळा व्यवस्थापन समितीने या शाळेसाठी निधी उपलब्ध व्हावा अशी मागणी प्रशासनाकडे केली होती. तसेच या कामाच्या संदर्भात पालकांनी जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे यांचीही भेट घेतली. श्री रावराणे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचे लक्ष वेधले होते. नाम. नितेश राणे यांनी या कामासाठी तात्काळ 5 लाख रु. निधी उपलब्ध करून दिला आहे.

मंगळवारी या कामाचा शुभारंभ पार पडला. यावेळी सरपंच वासुदेव रावराणे, युवा कार्यकर्ते सिद्धेश उर्फ बंटी रावराणे, आदेश रावराणे, भाई रावराणे, सुशील रावराणे, रुपेश रावराणे, वासुदेव रावराणे, सत्यवान जाधव, शशिकांत रावराणे, श्रीधर कडू, शिवाजी कडू, महादेव कडू, तातू कडू, प्रमोद कडू, शेखर कडू व ग्रामस्थ, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.