जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने मोफत नेत्रतपासणी शिबिर पार पडले

इन्फिगो आय केअर हॉस्पिटलचा पुढाकार
या शिबिराचा न्यायालयीन कर्मचाऱ्यांना लाभ

रत्नागिरी : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रत्नागिरी आणि इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा न्यायालय रत्नागिरी येथे मोफत नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आज शनिवारी दि. १५ जुलै रोजी आयोजित या शिबिरामध्ये ११५ न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी लाभ घेतला.

यावेळी शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हा न्यायाधीश मा.श्री. ए. एम. अंबाळकर, जिल्हा पोलिस अधीक्षक श्री. धनंजय कुलकर्णी, इन्फिगो आय केअर हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीधर ठाकूर हे उपस्थित होते.

या वेळी इन्फिगो आय केअर हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीधर ठाकूर यांनी कर्मचाऱ्यांना डोळ्यांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी आणि योग्य उपचार घेण्याबाबत मार्गदर्शन केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या सहकार्याने सदर शिबिराचे यशस्वी आयोजन इन्फिगो आय केअर हॉस्पिटलने केले.