ज्येष्ठ नागरिकांसाठी विधी सेवा प्राधिकरणाचा साक्षरता कार्यक्रम संपन्न

रत्नागिरी: जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रत्नागिरी यांच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी एका साक्षरता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम दिनांक १७ नोव्हेंबर २०२५ रोजी जिल्हा न्यायालयाच्या सभागृहात पार पडला.

ज्येष्ठ नागरिक व पालकांचे कल्याण, निर्वाह अधिनियम २००७ या कायद्यातील तरतुदींची माहिती ज्येष्ठ नागरिकांना मिळावी, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. याप्रसंगी उपमुख्य लोकअभिरक्षक, श्री. उन्मेश मुळये यांनी उपस्थितांना या कायद्याची सविस्तर माहिती दिली. सहाय्यक लोकअभिरक्षक आयुधा देसाई यांनी ज्येष्ठ नागरिकांकरिता असलेल्या विविध शासकीय योजनांची माहिती सादर केली. तसेच, मा. सचिव श्री आर. आर. पाटील यांनी नालसा स्कीम फॉर सिनियर सिटिझन २०१६ (NALSA Scheme for Senior Citizens 2016) या योजनेची माहिती दिली.