खेड – नगरपरिषद निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर आज शहरातील नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया पूर्ण झाली असून, वैध ठरलेल्या उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर करण्यात आली आहे. विविध पक्षांसह अपक्ष उमेदवारांनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदवल्याने खेड शहरातील निवडणूक रणधुमाळी अधिक रंगतदार बनली आहे.
सर्वप्रथम नगराध्यक्षपदासाठी दाखल झालेल्या अर्जांपैकी पाच उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. शिवसेनेच्या माधवी राजेश बुटाला, अपक्ष वैभवी वैभव खेडेकर, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या सपना ऋषिकेश कानडे, तसेच शिवसेनेच्या तेजल प्रेमळ चिखले यांचे अर्ज तपासणीत वैध ठरले. याचबरोबर वंचित बहुजन आघाडीच्या सीमा नितीन जाधव यांच्याही अर्जाला मंजुरी देण्यात आली आहे. या पाच उमेदवारांमध्ये चुरस निर्माण होण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तवली जात आहे.
नगरसेवक पदांसाठी सर्व प्रभागांमधून आलेल्या उमेदवारी अर्जांचीही छाननी पूर्ण झाली असून, मोठ्या संख्येने उमेदवारांची नावे यामध्ये समोर आली आहेत.
प्रभाग क्रमांक 1 ‘अ’ मधून शिवसेनेच्या वर्षा तुषार सापटे, अपक्ष आशा अनिल सरगरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे चिंतल प्रदीप भंडारे हे तिघेही निवडणूक रिंगणात आहेत. प्रभाग क्रमांक 1 ‘ब’ मध्ये शिवसेनेचे निकेतन आनंद पाटणे, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे ओंकार विलास कुलकर्णी आणि अपक्ष संदेश शिवराम भुवड यांच्यात त्रिकोणी लढत पाहायला मिळणार आहे.
प्रभाग क्रमांक 2 ‘अ’ मध्ये शिवसेनेच्या दीप्ती दत्ताराम शिगवण आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या मनीषा राजन निर्मळ यांचे अर्ज वैध ठरले आहेत. तर प्रभाग क्रमांक 2 ‘ब’ मध्ये भाजपचे रहीम युसुफ सहीबोले, अपक्ष अनिल वसंत मोरे, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे ईशान बशीर हमदुले, शिवसेनेचे मन्सूर अहमद मुकादम आणि अपक्ष जावेद अब्दुल कपूर कौचाली असे पाच उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत.
प्रभाग क्रमांक 3 ‘अ’ मधून शिवसेनेची नीता केतन आंब्रे, एनसीपी शरदचंद्र पवार गटाच्या अश्विनी अशोक दरेकर आणि अपक्ष प्रेरणा प्रकाश देसाई यांचे अर्ज वैध ठरले. प्रभाग क्रमांक 3 ‘ब’ मध्ये शिवसेनेचे सुनील बाबुराव दरेकर आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे चंद्रशेखर केरू पाटणे यांच्यात थेट सामना रंगणार आहे.
प्रभाग क्रमांक 4 ‘अ’ मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या शर्मिला सागर पवार, एनसीपी शरदचंद्र पवार गटातूनही शर्मिला सागर पवार आणि शिवसेनेच्या अंजुम जबीर कुरणे यांचे अर्ज तपासणीत वैध ठरले आहेत. तर प्रभाग क्रमांक 4 ‘ब’ मध्ये एनसीपीचे वजूद्दीन महमूद परकर, शिवसेनेचे तौसीब अब्दुल कादरी खोत आणि एनसीपीचेच अब्दुल मुतलीब गुलाम-होद्दीन घरटे यांच्यात तिरंगी लढत होणार आहे.
प्रभाग क्रमांक 5 मध्ये शिवसेनेचे यश राकेश खेडेकर, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे बाळाराम बाळू खेडेकर आणि शिवसेनेच्या रूपाली राकेश खेडेकर या तिन्ही उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. प्रभाग क्रमांक 5 ‘ब’ मध्ये एनसीपीचे जय मला जगदीश पाटणे, शिवसेनेच्या आरती महिंद्र पवार, शिवसेनेच्या अक्षदा अमोल दळवी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या सुनिता सागर खालकर असे चार उमेदवार रिंगणात आहेत.
प्रभाग क्रमांक 6 ‘अ’ मध्ये भाजपच्या वैभवी वैभव खेडेकर, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या रूपाली ओंकार कुलकर्णी, एनसीपीच्या अपेक्षा अनिल सदरे आणि शिवसेनेच्या अक्षता अमोल दळवी यांचे अर्ज वैध ठरले. तर प्रभाग क्रमांक 6 ‘ब’ मध्ये सतीश गणपत चिकणे (शिवसेना), सतीश कदम (उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना) आणि एनसीपीचे अनिल रामचंद्र सुदरे यांच्यात काट्याची लढत अपेक्षित आहे.
प्रभाग क्रमांक 7 ‘अ’ मध्ये शिवसेनेचे स्वप्निल पांडुरंग सैतवडेकर, अपक्ष वसंत बळीराम पिंपळकर आणि एनसीपीचे प्रणव प्रमोद म्हापूसकर यांचे अर्ज वैध ठरले आहेत. प्रभाग क्रमांक 7 ‘ब’ मध्ये भाजपच्या स्वप्नाली राकेश चव्हाण, अपक्ष कौसर बशीर मुजावर, शिवसेनेची जागृती सुदेश लंबाडे आणि अपक्ष श्रद्धा सागर कवळे या चार उमेदवारांची नावे जाहीर झाली आहेत.
प्रभाग क्रमांक 8 ‘अ’ मध्ये शिवसेनेचे प्रेमल श्रीधर चिखले, आय काँग्रेसचे स्वराज विक्रांत गांधी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ऋषिकेश मनोहर कानडे उमेदवारी रिंगणात टिकले आहेत. प्रभाग क्रमांक 8 ‘ब’ मध्ये अपक्ष प्रीती स्वरूप माजलेकर, शिवसेनेची संजना संजय कुडाळकर आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची सुरभी सुनील धामणस्कर यांच्या अर्जांना मंजुरी मिळाली आहे.
प्रभाग क्रमांक 9 ‘अ’ मध्ये शिवसेनेची रसिका राकेश खेडेकर, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची आरोही संतोष शिंदे आणि अपक्ष आनंद नवीन चौगुले असा तिरंगी मुकाबला पाहायला मिळणार आहे. प्रभाग क्रमांक 9 ‘ब’ मध्ये शिवसेनेचे भूषण शांताराम चिखले, अपक्ष भालचंद्र रवींद्र साळवी, अपक्ष वैजेश रघुनाथ सागवेकर आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे सुनील मनोहर धामणस्कर यांचे अर्ज वैध ठरले आहेत.
प्रभाग क्रमांक 10 ‘अ’ मध्ये शिवसेनेच्या रेश्मा अब्दुल रऊफ खतीब आणि आय काँग्रेसच्या नाझीमा शाफिल्ला खान यांच्या उमेदवारीची नोंद झाली आहे. तर प्रभाग क्रमांक 10 ‘ब’ मध्ये शिवसेनेचे आरिफ फकी मोहम्मद मुल्लाजी, आय काँग्रेसचे बशीर अहमद अब्दुल रहिमान मुजावर आणि अपक्ष दानिश अजित मणियार या तिघांचे अर्ज वैध ठरले आहेत.
संपूर्ण खेड नगरपरिषद क्षेत्रात विविध पक्ष व अपक्ष उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल केल्याने येणारी निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता प्रचाराला सुरुवात होताच शहरातील राजकीय वातावरण आणखी तापणार असून नागरिकांचे लक्ष आगामी निवडणूक घडामोडींवर केंद्रीत होणार आहे.












