जोरदार घोषणाबाजी करत वेंगुर्ले न. प.निवडणुकीत शिवसेनेने फोडला प्रचाराचा नारळ

वेंगुर्ले : प्रतिनिधी
वेंगुर्ला नगरपरिषद निवडणूक २०२५ च्या शिवसेना च्या प्रचाराचा शुभारंभ वेंगुर्ला ग्रामदैवत श्री देव रामेश्वर, ग्रामदेवता श्री सातेरी व श्री स्वामी समर्थ चरणी श्रीफळ ठेवून करण्यात आला.

वेंगुर्ला नगरपरिषद निवडणुकीसाठी शिवसेनेचे नगराध्यक्ष नागराध्यक्ष पदाचे उमेदवार नागेश गावडे व २० नगरसेवक यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज करण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार नागेश गावडे, माजी नगराध्यक्ष सुनिल डुबळे, शहरप्रमुख उमेश येरम, तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, युवा सेना जिल्हाप्रमुख हर्षद डेरे, तालुका प्रमुख सागर गावडे तसेच सत्यवान साटेलकर, आस्वाद पोतनीस, सुहास कोळसुलकर, प्रथमेश पालयेकर,अजय माणगावकर, निराश गिरप, सन्नी मोरे, समिर म्हापणकर, स्वप्निल परब, जयेश गावडे, श्याम कोलगेकर, अमोल जगताप तसेच श्री रामेश्वर देवस्थानचे श्री. गुरव, सातेरी देवस्थानचे सुनिल परब, स्वप्निल परब, अन्य मानकरी, पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी शहरातील विकास कामांच्या जोरावर व आ. दिपक केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही बाजी मारू, असा विश्वास सचिन वालावलकर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.