ओटवणे (प्रतिनिधी ) कोनशी गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली देवीचा वार्षिक जत्रोत्सव शुक्रवार 21 नोव्हेंबर रोजी विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांनी उत्साहात संपन्न होत आहे. देवीला साकडं घालणे नवस फेडणे नवस बोलणे आदी कार्यक्रम पार पडणार आहेत तर रात्रौ 12 वाजता सवाद्य पालखी मिरवणूक सोहळा आणि त्यानंतर माऊली दशावतार नाट्य मंडळ कोनशी यांचा संयुक्त दशावतार नाट्य प्रयोग शिवशक्ती संग्राम हा दशावतार नाट्य प्रयोग सादर होणार आहे तरी या जत्रोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन कोनशी माऊली देवस्थान कमिटी, मान मानकरी आणि ग्रामस्थ यांसकडून करण्यात आले आहे.












