पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ तेर्सेबांबर्डे येथे एक पेंड माँ के नाम अंतर्गत वृक्षारोपण 

सेवा पंधरवडा निमित्त जिल्ह्यात भाजपाच्या वतीने सेवेला समर्पित उपक्रम राबवणार- प्रभाकर सावंत

कुडाळ:-देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात येणाऱ्या सेवा पंधरवडा कार्यक्रमात तालुक्यातील तेर्सेबांबर्डे गावातील रामेश्वर मंदिर येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना देश सेवा करण्यासाठी उदंड व निरोगी आयुष्य मिळावे यासाठी रामेश्वर चरणी गाऱ्हाणे घालून मंदिर परिसरात एक पेंड माँ के नाम अंतर्गत वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत म्हणाले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वतःचे आयुष्य देशसेवेसाठी वाहून घेतले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे विश्वनेते आहेत जगात मोदींनी आपली स्वतःची एक वेगळी छाप पाडली आहे. भारत देशाच्या प्रगतीसाठी त्यांचे खूप मोठे योगदान आहे. आपण सर्व नशीबवान आहोत की प्रधानमंत्री मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची आपल्याला संधी मिळत आहे. पुढील पंधरा दिवस संपूर्ण जिल्हाभरात सेवेला समर्पित उपक्रम राबवणार असल्याचे यावेळी श्री सावंत यांनी सांगितले. एक झाड आईच्या नावे लावून प्रत्येकाने आपले योगदान द्यावे असे आवाहन श्री सावंत यांनी यावेळी केले. यावेळी किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष उमेश सावंत, तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, राजू राऊळ, मोहन सावंत, रुपेश कानडे व भाई बेळणेकर सरचिटणीस, सरपंच तेर्सेबांबर्डे रामचंद्र परब, सरपंच हुमरस सीताराम तेली, श्वेता लंगवे माजी पंचायत समिती सदस्या, गुणाजी जाधव जिल्हा उपाध्यक्ष अजा जमाती मोर्चा, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष वैभव शेणई,शक्तिकेंद्र प्रमुख सोनू मेस्त्री, बूथ अध्यक्ष संतोष डीचोलकर, बूथ अध्यक्ष झाराप अमोल तेली, रुपेश बिडये, रमेश परब, ग्रा प सदस्य- माधवी कानडे, रेश्मा परब, प्रभाकर डीचोलकर, सागर कोरगावकर, पिंट्या साटेलकर, प्रदीप परब, प्रितेश धुरी, गणपत डीचोलकर, बाळा सडेकर, कमलाकांत शेणई, दिवाकर कानडे, वैभव पवार, अंकुश बाँबर्डेकर , मनोहर कुबल, विभावरी चव्हाण आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.