सावंतवाडी | कोलगावचे माजी सरपंच व श्री देव कलेश्वर मंदिरचे माजी अध्यक्ष बाबा राऊळ (वय ६८) यांचे निधन झाले.
गेले वर्षभर ते आजारी होते. घरीच त्यांच्यावर उपचार सुरु होते. दरम्यान, उपचारादरम्यान गुरुवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. संध्याकाळी अंत्यविधी होणार आहेत. त्यांच्या पश्चात मुलगी, नातू असा परिवार आहे.











