बांदा (प्रतिनिधी) –
डोंगरपाल येथील श्री देवी माऊली देवीचा वार्षिक जत्रोत्सव शुक्रवार २१ नोव्हेबर रोजी साजरा होणार आहे. यानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी १० वाजता देवीची पूजाअर्चा, अभिषेक करून नंतर मानाच्या ओट्या भरून गाऱ्हाणे घालण्यात येईल. त्यानंतर ओट्या भरणे, दर्शन, नवस करणे व फेडणे आदी कार्यक्रम सुरू राहतील.
सायंकाळी ७ वाजता श्री देवी माऊली मंदिर परिसरात उभारण्यात आलेल्या बहुउपयोगी वास्तुचे मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार आहे. रात्री ११ वाजता श्री देवीचा पालखी प्रदक्षिणा सोहळा व मध्यरात्री कलेश्वर दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोग होईल. पहाटे गोपाळकाल्याने जत्रोत्सवाची सांगता होईल. या सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन श्री देवी माऊली देवस्थान कमिटी, देवस्थान मानकरी आणि डोंगरपाल ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.











