कानाच्या विकारांनी ग्रस्त प्रवर्गातील मुलांसाठी 25 रोजी ओरोस येथे मोफत तपासणी शिबीर!

जास्तीस्त जास्त लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांचे आवाहन

मसुरे | झुंजार पेडणेकर
जन्मजात बालकापासून 18 वर्ष वयोगटातील कानाच्या विकारांनी ग्रस्त प्रवर्गातील मुलांसाठी तपासणी शिबीर दिनांक २५ नोव्हेंबर २०२५ रोजी जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्ग येथे आयोजित करणेत आलेले आहे. सदर शिबिरामध्ये KARAN HOSPITAL, KOLHAPUR

येथून स्पेशालिस्ट उपस्थित राहणार आहेत. सदर शिबीरामध्ये कानाच्या समस्यांनी ग्रस्त
बालकांची तपासणी करणेत येणार आहे

तरी सदर प्रवर्गातील जास्तीत जास्त बालकांनी सदर शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. श्रीपाद पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक सिंधुदुर्ग यांनी केले आहे.

अधिक माहिती साठी जिल्हा कार्यक्रम पर्यवेक्षक श्री राजेश पारधी 9422373188 यांच्याशी संपर्क साधावा.