सावंतवाडी येथे संविधान सन्मान परिसंवाद कार्यक्रम रविवारी 23 नोव्हेबर रोजी.

ओटवणे (प्रतिनिधी )
बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज प्रबोधन समन्वय समिती, सावंतवाडी आयोजित संविधान सन्मान परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन रविवार 23 नोव्हेंबर रोजी 9.30 वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर सावंतवाडी येथे करण्यात आले आहे.आपला देश हा विविधतेने नटलेला आहे इथे विविध जाती, पंथाचे, धर्माचे लोक राहतात. देश हा विविधतेने नटलेला आहे तरी सुद्धा लोक गुण्या गोविंदाने राहतात याच कारण म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दिलेलं संविधान या संविधानावरच देश चालतो.जाती धर्मात संघर्षाची स्थिती तयार झाल्यास आपलं संविधानच आपणाला एकसंघ ठेवतो आपण प्रथम:आणि अंतिमतःभारताचे नागरिक आहोत ही भावना जागृत करते.त्यामुळेच संविधानाचा सन्मान राखणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्यच नसून जबाबदारी आहे. यासाठीच संविधानाच्या सन्मानार्थ संविधानिक मूल्ये समाजात रुजवून सक्षम समाज आणि राष्ट्र निर्मितीसाठी संविधान सन्मान परिसव्वाद सारख्या कार्यक्रमाची गरज असून याच उद्देशाने बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज प्रबोधन समन्वय समिती सावंतवाडीने आयोजन केले आहे. या कार्यक्रमाला संविधान संवर्धन चळवळ महाराष्ट्र राज्य अध्यक्षता आयु. संग्राम सावंत उपस्थित राहणार आहे या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिकांना उपस्थित रहावे असे आवाहन बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज प्रबोधन समन्वय समिती सावंतवाडी कडून करण्यात आले आहे.