आयएसआयशी संबंधित ४ आंतरराष्ट्रीय शस्त्र तस्करांना अटक
नवी दिल्ली: दिल्ली गुन्हे शाखेने पाकिस्तानी आयएसआयशी जोडलेल्या आंतरराष्ट्रीय शस्त्र तस्करीच्या टोळीतील चार आरोपींना अटक केली आहे. तुर्की आणि चीनमध्ये बनवलेल्या उच्च दर्जाच्या पिस्तूल पाकिस्तानमार्गे भारतात पुरवठा करण्यासाठी ही टोळी काम करत होती. महत्त्वाचे म्हणजे ही शस्त्रे पाकिस्तानमधून ड्रोनद्वारे पंजाबमध्ये टाकली जात होती आणि नंतर पुन्हा विकली जात होती.
याप्रकरणात अजय, मनदीप, दलविंदर आणि रोहन अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. अटक केलेल्या आरोपींपैकी दोघेजण पंजाबचे आहेत. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले तेव्हा १० महागड्या परदेशी पिस्तूल आणि ९२ जिवंत काडतुसे जप्त केली. ज्याचा पुरवठा दिल्ली आणि आसपासच्या राज्यांमधील गुन्हेगार आणि गुंडांना केला जात होता












