रत्नागिरीत राबवले गेले “सागर कवच अभियान

रत्नागिरी : 
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दि 19 नोव्हेंबर रोजी सकाळी 6 ते दि.20 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 6 वा पर्यंत “सागर कवच अभियान राबविण्यात आले. या अभियानामध्ये रत्नागिरी पोलीस दल, तटरक्षक दल, नौदल, कस्टम, बंदर विभाग, फिशरी विभाग, समुद्र किनाऱ्यावरील खासगी बंदरे, जेट्टी आस्थापना ह्या सहभागी झाल्या होत्या.
हे अभियान भारतीय तटरक्षक दलाकडून एकाच वेळी महाराष्ट्र व गोवा राज्यात राबविण्यात आले. या अभियाना दरम्यान दि 19 नोव्हेंबर रोजी दुपारी 1.25 शत्रू पक्ष (टेड फोर्स) कडून एक घुसकोर टीम बोटी द्वारे रत्नागिटी समुद्र किनाऱ्याच्या दिशेने पाठविण्यात आलेली होती. या अभियान मधील बचावाचे काम करणाऱ्या सुरक्षा एजन्सी (ब्ल्यू फोर्स) कडून “आई लाभ-लक्ष्मी“ या ट्रॉलट बोट पेट्रोलिंग दरम्यान लाइट हाऊस रत्नागिरी समोरील अरबी समुद्रात 3.5 नॉटिकल मेल अंतरावर सदर टेड फोर्स (शत्रू पक्ष) “नवदुर्ग“ नावाची एक बोट संशयास्पद फिरताना पकडण्यात आलेली आहे. व सदर दलाने बोटीवर चढून चौकशी केली असता बोटीवर अभियाना मधील संशयित 6 इसम मिळून आल्याने बचावाचे काम करणाऱ्या सुरक्षा एजन्सी (ब्ल्यू फोर्स) यशस्वी झालेली आहे.


या अभियानाचा उद्देश सागरी मार्गाने होणाऱ्या घुसखोऱ्या व आतंकवादी कारवाई रोकणे तसेच सागरी सुरक्षेशी संबंधित सर्व विभागांनी घ्यावयाची खबरदारी व युद्धजन्य परिस्थितीत प्रतिसाद यांचा सराव करणे व किनारपट्टी सुरक्षे संबंधी सर्व सागरी घटकांना प्रशिक्षण देणे व सागरी सुरक्षा घटकांमध्ये समन्वय साधणे,(ब्ल्यू फोर्स) यशस्वी झालेली आहे.या अभियानात पोलीस अधिकारी48,पोलीस अंमलदार464, होम गार्ड100,सुरक्षा वार्डेन 47,सागर रक्षक दल सदस्य 41,पोलीस पाटील68,एन.सी.सी कॅडेट 44,एन.एस.एस विद्यार्थी 40, सहभागी झाले होते. तसेच यात अधिग्रहीत ट्रॉलर 2 आणि या अभियाना दरम्यान एकूण 4,787 विविध वाहने तपासण्यात आली, 9,789 व्यक्ती तपासण्यात आल्या. समुद्रातील विविध 80 बोटी व या बोटीवरील 960 व्यक्तिंची तपासणी करण्यात आली.