कुसूरजवळ टायर फुटून रिक्षा पलटी : चार जण जखमी

वैभववाडी प्रतिनिधी
अचानक टायर फुटून रिक्षाचा अपघात झाला. शनिवारी सायंकाळी 5 वा. कुसूर येथे हा अपघात घडला. या अपघातात चार जण किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्व जखमींची प्रकृती स्थिर आहे. अपघाताची नोंद वैभववाडी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

रिक्षा चालक गणपत तुकाराम कदम वय 51 रा. उंबर्डे हे आपल्या ताब्यातील रिक्षा घेऊन वैभववाडीहून कोळपेकडे जात होते. कुसूर नजीक रिक्षाचा टायर अचानक फुटला. व रिक्षा रस्त्याच्या बाहेर पलटी झाली. या अपघातात चालक गणपत कदम जखमी झाले आहेत. रिक्षात एकूण चार प्रवासी होते. त्यामध्ये प्रकाश पांडुरंग साळुंखे वय 45 रा. कुसूर, रजिया कमरुद्दिन नावळेकर वय 32 रा. कोळपे, अरमान कमरुद्दिन नावळेकर वय 8 रा. कोळपे, विजय विष्णू सोनाळकर वय 42 रा. उंबर्डे यांचा समावेश आहे. यातील तीघेजण जखमी आहेत. जखमींना येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. या अपघाताची नोंद वैभववाडी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. अधिक तपास वैभववाडी पोलीस करत आहेत.