भाजपा सरकारने कामगारांसाठी केलेल्या भरीव कार्याची माहीती मतदारांना देणार
वेंगुर्ले : प्रतिनिधी
वेंगुर्ला नगरपरिषद निवडणूक पार्श्वभूमीवर आज भाजपा कामगार मोर्चाचे जिल्हाध्यक्ष श्री अशोक राणे तसेच भाजपा प्रणित सेवा शक्ती संघर्ष एस टी कर्मचारी संघ वेंगुर्ला आगारातील पदाधिकारी यांनी वेंगुर्ला भाजपा कार्यालयात भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तसेच सेवा शक्ती संघर्ष एस टी कर्मचारी संघ वेंगुर्ला अध्यक्ष श्री बाळू देसाई यांची भेट घेतली. या वेळी अनेक विषयावर चर्चा करून होणाऱ्या नगरपंचायत निवडणुकीत भाजपा सर्व उमेदवार यांना पूर्ण पाठिंबा देण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले, तसेच वेंगुर्ले शहरातील कामगारांची भेट घेऊन, भाजपा सरकारने कामगारांसाठी जे सकारात्मक निर्णय घेतले त्यांची माहीती दिली जाईल असे सांगीतल.
या वेळी सेवा शक्ती संघर्ष विभागीय सचिव श्री भरत चव्हाण, वेंगुर्ला आगार सचिव श्री दाजी तळवणेकर, विभागीय उपाध्यक्ष श्री संजय सावंत, कणकवली आगार अध्यक्ष श्री मनोजकुमार पवार, श्री उदय मसुरकर , विजयदुर्ग आगार सचिव श्री रोहन शिंदे, वेंगुर्ला आगार उपाध्यक्ष श्री भाऊ सावळ, श्री अनंत झोरे, श्री प्रकाश मोहिते , प्रशांत खानोलकर , शरद मेस्त्री अन्य सभासद उपस्थित होते.













