आवश्यक त्या ठिकाणी अधिक लाईट, स्वच्छता तसेच अन्य व्यवस्था : नगराध्यक्ष ममता वराडकर यांची माहिती
मालवण | प्रतिनिधी : गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मालवण नगर परिषदेच्या वतीने शहरातील गणेश विसर्जन ठिकाणी निर्माल्य कलश, आवश्यक त्या ठिकाणी अधिक लाईट, स्वच्छता तसेच अन्य व्यवस्था करण्यात आली आहे. पालिका कर्मचारीही विसर्जन ठिकाणी तैनात ठेवण्यात आले आहेत.
नगराध्यक्षा ममता वराडकर सर्व व्यवस्थेवर विशेष लक्ष ठेवून आहेत. उपायोजनांच्या दृष्टीने पालिका प्रशासनास आवश्यक त्या सर्व सूचना करण्यात आल्या आहेत तसेच सर्व व्यवस्थाही करून घेण्यात आली आहे.
काही गणेश विसर्जन ठिकाणी शेवाळ जमा होतो त्या ठिकाणी ब्लिचिंग पावडर टाकून परिसर स्वच्छ करण्यात आला आहे. प्रत्येक ठिकाणी पालिका कर्मचारी ही तैनात ठेवण्यात आले आहेत. शुक्रवारी मालवण शहरात पाच दिवसाच्या गणपती बाप्पांचे भक्तिमय वातावरणात विसर्जन करण्यात आले.












