माजी नगराध्यक्ष सुनिल डुबळे यांचा प्रभागामध्ये घरोघरी प्रचार..

वेंगुर्ले : प्रतिनिधी

शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा शिवसेना पक्षाचे वेंगुर्ले नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक ५ मधील नगरसेवक पदाचे उमेदवार सुनिल शशिकांत डुबळे आणि सानवी जयेश गावडे यांनी आज शहरातील ओंकारेश्वर दत्त मंदिर येथे दर्शन घेऊन आपल्या प्रभागात घरोघरी जाऊन प्रचार केला.

यावेळी जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, सतीश डुबळे, युवा सेना जिल्हाप्रमुख हर्षद डेरे, अन्य उमेदवार, नागरिक सहभागी झाले होते. नगराध्यक्ष नागेश गावडे यांनी गेल्या चार दिवसात दमदार डोअर टू डोअर प्रचार प्रक्रिया राबविली आहे. त्यानाही शहरवासियांतून चांगला प्रतिसाद मिळाला आहे.