माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांचा जोरदार प्रचार

श्रद्धाराजे भोंसले यांच्यासह भाजपच्या विजयाचा विश्वास

​सावंतवाडी । प्रतिनिधी : आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर आणि सुनीता पेडणेकर यांनी प्रभाग क्रमांक २ मध्ये जोरदार प्रचार केला. यावेळी श्री. साळगावकर यांनी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांच्यासह भाजपचे उमेदवार विजयी होतील, असा विश्वास व्यक्त केला.

​प्रभाग क्रमांक २ मध्ये साळगावकर आणि पेडणेकर यांनी कार्यकर्त्यांसह जोरदार प्रचारफेरी काढली. यावेळी संतोष तळवणेकर, दिपक सावंत, ज्ञानेश्वर पारधी आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

​जनतेशी संवाद साधताना श्री. साळगावकर म्हणाले, “जनतेची साथ आम्हाला आहे. मी यापुढील माझे जीवन जनतेसाठी समर्पित करत असून, दिलेली वचनं पूर्ण करण्याची जबाबदारी माझी राहील.” त्यांनी जनतेला दिलेला हा विश्वास मतदारांमध्ये उत्साह निर्माण करणारा ठरला.