भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची आज वेंगुर्ले येथे जाहीर सभा…

पालकमंत्री नितेश राणे यांची असणार उपस्थिती..

वेंगुर्ले l प्रतिनिधी :वेंगुर्ला नगरपरिषद निवडणूक २०२५ निमित्त वेंगुर्ला माणिक चौक येथे आज २५ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता भाजप चे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.

यावेळी मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. भाजप चे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्री. दिलीप गिरप व सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ या जाहीर सभेचे आयोजन केले असून सदर सभेस सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन भाजप तर्फे करण्यात आले आहे.