खोटे जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी नवरा बायकोचे ‘कर्मकांड’

फसवणून करून भाजपा कडून नगराध्यक्ष उमेदवारी घेतली

शिल्पा यतीन खोत यांनी जनतेची आणि भाजपाची माफी मागावी

खोट्या प्रकरणात भाजपा नेत्यानी अथवा पालकमंत्री यांनी कुठलीही मदत केली नाही

आमदार निलेश राणे यांनी पुरावेच दाखवत केला पर्दाफाश

कोर्टात रिट पिटीशन दाखल केल्याची ही दिली माहिती

मालवण | प्रतिनिधी : मालवण नगरपरिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्ष उमेदवार सौ. शिल्पा यतीन खोत यांनी त्यांचे पति यतीन खोत यांच्या संगनमताने बनावट कागदपत्रे सादर करून कुणबी मराठा हे जात प्रमाणपत्र मिळविले आहे. याबाबतचे पुरावे आमच्याकडे आहेत. खोटे जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी नवरा बायकोने हे ‘कर्मकांड’ रचले आहे. फसवणून करून भाजपा कडून नगराध्यक्षा उमेदवारी घेत शिल्पा यतीन खोत यांनी जनतेची आणि भाजपाची फसवणूक केली आहे. या खोट्या प्रकरणात भाजपा नेत्यांची अथवा पालकमंत्री यांनी कुठलीही मदत केली नाही. असे सांगत आमदार निलेश राणे यांनी पुरावेच दाखवत संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे. दरम्यान, कोल्हापूर खंडपिठाकडे यासंदर्भाने रिट पिठीशन दाखल केले आहे. असेही आमदार निलेश राणे यांनी स्पष्ट केले.

मालवण येथील शिवसेना प्रचार कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत आमदार निलेश राणे बोलत होते. यावेळी जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, संजय पडते, दादा साईल, आनंद शिरवलकर, राजा गांवकर, परशुराम पाटकर, यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी आमदार नीलेश राणे म्हणाले, शिल्पा खोत यांनी भारतीय जनता पक्षाची दिशाभूल करून नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळविली आहे. खोत ७ नोव्हेंबर पर्यंत मराठा होत्या. त्या नंतर त्या कुणबी झाल्या. या खोडसाळपणामध्ये त्यांना त्यांचे पति यतीन खोत यांनी मदत केली. खोत दांपत्याने मराठा समाजालाही फसविले आणि कुणबी (ओबीसी) समाजालाही त्या आता फसवत आहेत.

शिल्पा खोत पूर्वीच्या परब यांच्या शाळेच्या दाखल्यावर हिंदू मराठा असा उल्लेख आहे. शिवाय त्यांच्या वडिलांच्याही शाळेच्या दाखल्यावर हिंदू मराठा असा उल्लेख असलेली कागदपत्रे तसेच अन्य कागदपत्रे आमदार निलेश राणे यांनी सादर केली.

बोगस जात प्रमाणपत्र सादर करून शिल्पा यतीन खोत यांनी मालवण नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. खोत यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना अंधारात ठेवून आपली उमेदवारी मिळविली आहे. शिल्पा खोत या मालवणच्या जनतेला फसवित आहेत. त्या निवडून येणार नाही हे सत्य असले तरीही त्या एक मतांनी जरी निवडून आल्या तर त्यांचा उमेदवारी अर्ज कोर्टात टिकणार नाही. निवडणूक छाननीत त्यांच्या अर्जावर आक्षेप आला तेव्हा हे प्रकरण निवडणूक निर्णय अधिकारी स्तरावरील नाही एवढेच म्हटले. त्यामुळे यातील खोटेपणा कोर्टात सिद्ध होईल. असे सांगत आमदार निलेश राणे यांनी अनेक पुरावेच कागदपत्रसह समोर मांडले. सगळीकडे यापूर्वी मराठा नोंद असलेल्या आता कुणबी कश्या झाल्या. असा सवाल उपस्थित करत खोट्या कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यात सादर करण्यात आलेली वंशावळ व अन्य सर्व नोंद चुकीच्या पद्धतीने जमवली. याचे सर्व कागद सादर केले.

यांनी भाजपा पक्षाला फसविले आहे. यदाकदाचित त्या निवडून आल्याच तर भविष्यात मालवण वासियांना पोट निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. हे टाळायचे असेल तर खोत यांनी जनते समोर सत्य सांगून जनतेची माफी मागावी असे निलेश राणे म्हणाले.