उबाठाच्या प्रभाग क्रमांक पाच ब च्या उमेदवार सुनीता खालकर यांचा शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
खेड (प्रतिनिधी) — खेड नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापत असताना मोठी घडामोडी मात्र पहावयास मिळत आहे शहरातील प्रभाग क्रमांक पाच ब च्या उमेदवार सुनिता सागर खालकर या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरल्या होत्या मात्र गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या विकास कामांना प्रभावित होऊन त्यांनी आपला उमेदवारी अर्ज माघार घेत शिवसेना पक्षाला स्वइच्छेने जाहीर पाठिंबा दर्शवला असून त्यांनी तसे प्रतिज्ञा पत्र देखील सादर केले आहे.
मंगळवारी सायंकाळी मोठी राजकीय उलथापालथ पहावयास मिळाली. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष बाळाराम बाळू खेडेकर यांच्या होम ग्राउंड वरील आणि त्यांच्याच प्रभागातील उमेदवार सुनिता खालकर यांनी शिवसेना पक्षाचे उमेदवाराला अधिकृत पाठिंबा देत आपण या निवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर केले आहे.. खेड शहरात होणारी विकास कामे आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या कामावर प्रभावित होऊन त्यांनी हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे..पाहूया नेमक्या काय म्हणाल्या आहेत सुनीता खालकर..










