ग्राहकांची वाढती मागणी
कुडाळ:बजाज कंपनीने इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात कमालीचे यश संपादन केले असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातही चेतक इलेक्ट्रिक गाडीच्या विक्रीने उच्चांक गाठला आहे. याच पार्श्वभूमीवर बजाज चेतकचे नवीन इलेक्ट्रिक मॉडेल C25 01 नुकतेच कुडाळ येथे बाजारात दाखल झाले असून या गाडीला ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.
कुडाळ येथील बजाज चेतक शोरूममध्ये या नव्या मॉडेलचे अधिकृत लॉन्चिंग पार पडले. यावेळी नवीन मॉडेलची पहिली गाडी खरेदी करणाऱ्या ग्राहक चैताली गावडे यांना मान्यवरांच्या हस्ते गाडीच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मनोज सावंत, अमर नाईक, जावेद सिद्दिकी, सनत कुपकर उपस्थित होते. बजाज कुडाळचे व्यवस्थापक निलेश कडावलकर यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले.
यावेळी मंदार मांजरेकर, सागर पडते, चेतक सेल्स टीममधील तेजस तेरसे, मानसी राणे, रोहित कोचरेकर, अक्षय आरोलकर, जानवी गवंडे तसेच सर्व्हिस टीममधील वसंत धुरी, मधुकर धुरी, अवधूत जोशी, सुभाष धुरी, शशांक गोसावी आदी उपस्थित होते.
बजाज चेतकच्या सर्वच इलेक्ट्रिक गाड्या ग्राहकांच्या पसंतीस उतरल्या असून या वाहनांना मोठी मागणी असल्याचे व्यवस्थापक निलेश कडावलकर यांनी सांगितले. ग्राहकांनी स्वतःची आर्थिक बचत तसेच पर्यावरण संरक्षणासाठी इलेक्ट्रिक वाहनांचा जास्तीत जास्त वापर करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.












