सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारांना चिन्हांचं वाटप 

 क्रमवारीही जाहीर : २ तारीखला मतदान 

सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी नगरपरिषद निवडणूकीसाठी ७ अपक्षांनी नामनिर्देशन पत्र कायम ठेवलं असून बुधवारी त्यांना चिन्हांचं वाटप करण्यात आलं आहे‌. नगराध्यक्षपदासाठी २, नगरसेवक पदासाठी ५ असे ७ अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात असून शहरात अपक्षांचाही मोठा जोर आहे.

     यात नगराध्यक्षपदासाठी अन्नपूर्णा कोरगावकर यांना मेणबत्ती व निशाद बुराण यांना बॅट चिन्ह मिळालं आहे. नगरसेवक पदासाठी फरीदा बागवान फुटबॉल, समीऊल्ला ख्वाजा कोट, बबलू मिशाळ नारळ, सुरेश भोगटे नारळ, लतिका सिंग कपबशी असं चिन्हाचं वाटप करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली.

तर नगराध्यक्षपदासाठीच्या उमेदवारांसाठी मतदान यंत्रातील क्रमवारी देखील जाहीर झाली असून शिवसेनेच्या उमेदवार नीता कविटकर यांच्यासह अपक्ष उमेदवार अन्नपूर्णा कोरगावकर, अपक्ष उमेदवार निशाद बुराण, उबाठा गटाच्या उमेदवार सीमा मठकर, काँग्रेसच्या उमेदवार साक्षी वंजारी व भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार श्रद्धा भोंसले अशी अनुक्रमे नावे आहेत.