वेंगुर्ले : प्रतिनिधी
- वेंगुर्ला नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ निमित्त भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्री.दिलीप लक्ष्मण गिरप यांनी प्रभाग क्रमांक दोन मध्ये नगरसेवक पदाचे उमेदवार सौ गौरी गणेश माईनकर आणि श्री प्रितम जगन्नाथ सावंत यांच्या सोबत घरोघरी प्रचार करत नागरिकांशी संवाद साधला.
भाजपच्या साथीने वेंगुर्ला शहराच्या विकासासाठी उमेदवारांना कमळ चिन्हा समोरील बटण दाबून प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी वेंगुर्ला महिला मोर्चा प्रमुख सुजाता पडवळ, प्रभाग निरीक्षक सुभाष बोवलेकर, प्रमोद गावडे, निलेश गवस,शैलेश जामदार, दीपक नाईक,अशोक परब, अरुण मोरजकर, पद्मिनी सावंत, अश्विनी पालकर, श्रिया सावंत, कपिल सावंत, विष्णू सावंत,मयुरेश रेडकर, भूषण सावंत तसेच भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.












