महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड एग्रिकल्चरच्या वतीने आयोजन
मसुरे | झुंजार पेडणेकर : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड a एग्रिकल्चर (MACCIA) तर्फे श्रीलंका कन्स्ट्रक्शन सेक्टर डेलिगेशन सोबतच्या विशेष B2B इंटरअॅक्शन सेशन आणि “इंडियन चेंबर ऑफ इंटरनॅशनल बिझनेस” बैठक बेदमुठा ऑडिटोरियम, हेड ऑफिस, महाराष्ट्र चेंबर येथे संपन्न झाली.
यासाठी श्रीलंकेतील १० प्रतिष्ठित कंपन्या मुंबईत आल्या होत्या. बांधकाम क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, स्मार्ट बिल्डिंग सोल्यूशन्स, इंटिरिअर डिझाइन, EPC, इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग, स्मार्ट ग्लास टेक्नॉलॉजी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हीसेस या विविध क्षेत्रांमध्ये सहकार्य, व्यापार आणि भागीदारीच्या नव्या संधी निर्माण करण्याचा उद्देश यामागे होता.
या सेशनमध्ये सहभागी होणाऱ्या उद्योजकांना श्रीलंकन सप्लायर्स आणि कन्स्ट्रक्शन इनोव्हेटर्स सोबत थेट संवाद, मॉडर्न मटेरियल्स, रुफिंग, फ्लोअरिंग, इंटिरिअर टेक्नॉलॉजी, EPC सर्व्हीसेस यांचा प्रत्यक्ष परिचय, जॉइंट व्हेंचर्स, डिस्ट्रिब्यूटशिप, डीलरशिप किंवा टेक्नॉलॉजी कोलॅबोरेशन संधी, साउथ एशिया मधील क्रॉस-बॉर्डर ट्रेड व प्रकल्पांसाठी नेटवर्किंग आदी बाबत माहिती देण्यात आली.
MACCIA अशा उच्चस्तरीय प्रत्यक्ष संवादाच्या माध्यमातून भारतीय आणि श्रीलंकन उद्योगक्षेत्रात नवे पूल बांधण्याचा उद्देश ठेवत असल्याचे यावेळी सांगितले. यावेळी गगन महोत्रा (अध्यक्ष, इंटरनॅशनल ट्रेड कमिटी), दिलीप गुप्ता (उपाध्यक्ष, वेस्टर्न महाराष्ट्र-II), कुमुदिनी इरुगलबंधारा (असिस्टंट डायरेक्टर, श्रीलंका एक्सपोर्ट डेव्हलपमेंट बोर्ड), शिरानी अरियाराथने (काउंसिल (कॉमर्शियल), काउंसिल जनरल ऑफ श्रीलंका),प्रियांगा विक्रमसिंघे (काउंसिल जनरल ऑफ श्रीलंका), रविंद्र मंगवे (अध्यक्ष), अशिष पेडणेकर (अध्यक्ष, ट्रस्ट बोर्ड), संतोष मांडलेचा (पुढील अध्यक्ष), करुणाकर शेट्टी (उपाध्यक्ष, मुंबई-I) श्रीकृष्ण उर्फ दीपक परब (उपाध्यक्ष, कोंकण),शंकर शिंदे (उपाध्यक्ष, मुंबई-II) आदिसह उधोजक उपस्थित होते. या भेटीमुळे भारतीय आणि श्रीलंकन उधोग क्षेत्रात नवे पूल बांधण्याची संधी निर्माण होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.











